कापूस व सोयाबीन अनुदान लाभार्थी यादी ऑनलाईन पाहण्याची प्रोसेस :

कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य योजनेकरिता पोर्टल विकसित करण्यात आलेले आहे. या पोर्टलवर पीक निहाय व गावनिहाय वैयक्तिक खातेदारांची यादी देण्यात आलेली आहे.

कापूस व सोयाबीन अनुदान लाभार्थी यादी ऑनलाईन पाहण्यासाठी खालील सोयाबीन कापूस अनुदान वेबसाईट लिंकवर क्लिक करून ओपन करा.

 

➡️ लाभार्थी यादीत तुमचे नाव पाहण्यासाठी इथे क्लीक करा ⬅️

 

 

https://uatscagridbt.mahaitgov.in/FarmerLogin/Login

कापूस व सोयाबीन अनुदान वेबसाईट ओपन केल्यानंतर “Farmer Search/Disbursement Status” वर क्लिक करा.

पुढे Farmer Login मध्ये आधार नंबर टाकून Get OTP for Aadhaar Verification वर क्लिक करा.

OTP टाकून व्हेरिफाय करायचा आहे. पुढे राज्यातील सर्व विभागातील कापूस व सोयाबीन अनुदान लाभार्थी शेतकऱ्यांची यादी आपल्याला पाहायला मिळेल; त्यासाठी आपला विभाग, जिल्हा, तालुका व गाव निवडून सर्च वर क्लिक करा.

 

➡️ लाभार्थी यादीत तुमचे नाव पाहण्यासाठी इथे क्लीक करा ⬅️

 

कापूस व सोयाबीन अनुदान लाभार्थी यादी मध्ये आपण शेतकऱ्याचे नाव, सर्वे नंबर, खाता नंबर, पिकाचे नाव व क्षेत्र पाहायला मिळेल.

हेल्पलाइन क्रमांक: तांत्रिक सहाय्यासाठी, हेल्पलाइन क्रमांक ०२२- ६१३१ ६४०१ कार्यालयीन कामकाजाची वेळ: सोमवार ते शुक्रवार सकाळी ९.४५ ते सायंकाळी ६:१५ वा.